Saturday, July 14, 2018

रस्त्यांची दुर्दशा का होते

रस्ते खराब व्हायची कारणे कोणती आहेत? फक्त भ्रष्टाचार आहे की, इतर तांत्रिक कारणेपण आहेत? असं म्हणतात आपल्याकडे काळी माती असल्याने रस्ते लवकर खचतात. यात किती तथ्य आहे? कोकणाततर काळी माती नाही पण तिथलेपण बरेच रस्ते खराब आहेत. लोण्यासारखे रस्ते बनवणं खरंच अशक्य आहे का?प्लॅस्टिकच्या रस्त्यांवर काय मत आहे तुमचं?

- धनंजय रेड्डी (लातूर)
_________________________

शिवाजी डांगे - काही प्रमाणात भ्रष्टाचार असतो पण त्यात तांत्रिक बाबी सुद्धा महत्वाच्या असतात

सुचिकांत वनारसे - थोडं सविस्तर मांडाना सर.

शिवाजी डांगे - मातीचे गुणधर्म तपासून   घायला हवेत अन् त्या गुणधर्मा नुसार रस्त्याचे  स्ट्रक्चर डिझाईन होणे गरजेचे असत त्याच प्रमाणे त्यावरुन जाणाऱ्या वाहनाचा सर्वे सर्वात महत्वाचा कमी खर्चात रस्ते बनवणे शक्य आहे पण त्यासाठी माती सक्षमी करणा साठी प्रयत्न व्हावे गरजेचे आहे . प्लास्टिक रस्त्या विषयी किवा कुठल्याही रस्त्याचे वजन शेवटी मातीवर जाणार  अशा बऱ्याचशा बाबींचा विचार रस्त्याच्या बांधणी मधे होणे गरजेचे असते. उदा. काळी माती खचते हा तिचा गुणधर्म आपण बदलू शकतो त्याच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत जर खालची माती कणखर बनवली तर ते रस्ते दिर्घ काळ टिकू शकतील.

मयूर घोडे - रस्ता खराब होण्याची विविध कारणे असू शकतात. त्यापैकी काही मी इथे देत आहे.

१. निकृष्ट दर्जाचे डिझाईन
२. निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य
३. डिझाईन व साहित्य उत्तम असूनही जर रस्ता खराब झाला असेल तर अकुशल कामगार वा अभियंते.
४. डिझाईन करताना जितकी रहदारी आणि ज्या पद्धतीची रहदारी गृहित धरली आहे त्यापेक्षा जास्त रहदारी झाली तर. उदा. अचानक जड वाहनांची रहदारी वाढली तर.
५. डिझाईनमध्ये दिलेल्या प्रमाणे काम झाले नाही तर.
६. सरासरीपेक्षा अतिवृष्टी
७. सरासरीपेक्षा अतिउष्मा, ज्यामुळे डांबर वितळून खडीपासून वेगळे होते.

शिवाजी डांगे - कमी खर्चात

विशाल गोहील - आपल्या कडील रोड रोरल जास्तीत जास्त 20 टन वजनाचे असतात तर अवजड वाहतूक 80 टना पर्यंत होते अशाने रस्ते कसे टिकतील?

सुचिकांत वनारसे - रोड रोलर आणि अवजड वाहतूक काय रिलेशन असतं दादा, थोडं सांगा
आपल्या गटात कंत्राटदारपण आहेत, त्यांनीदेखील मते मांडा
तुमचा अभ्यास काय सांगतो ?

अजय - रस्त्याचा भराव करतेवेळी २० ते ३० से.मी. जाडीचा व उत्तम दर्जाच्या मुरमाने थर आंथरणे आवश्यक आहे. सदर थर हे योग्य रीतीने पाणी मारुन कमाल प्रॉक्टर घनते पर्यंत दबाई करावेत. रस्त्याचा पृष्ठभागाला योग्य कमानी सारखा आकार येण्या साठी भराव करतानांच काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरुन रस्त्याचे वरील कवच योग्य आणी तांञिकदृष्ट्या तयार करता येईल. रस्ता तयार करताना पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे देखील गरजेचे आहे, रस्याच्या पृष्ठभागावरील पाणी योग्य रितीने वाहुन जावे त्या करीता रस्त्याचा पृष्ठभाग हा कमानी च्या आकाराचा असणे आवश्यक आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा योग्य आकाराचे नाले बनविणे आवश्यक आहे. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे रस्ता बनविणारे कंञाटदार व कार्यकारी व पर्यवेक्षण अधिकारी व कर्मचारी यांची भ्रष्टाचार विरहित मानसिकता.

मनोज खांडरे -

रस्त्याच्या कामांकरिता त्याची संरचना (structural design ), कार्यपद्धती(work procedure ), साहित्याची आणि कार्यकुशलतेची गुणवत्ता (quality of materials & workmanship ) या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. रस्त्याचा भराव करतेवेळी रस्त्यास आवश्यक संपूर्ण मुरुम भराव एकदम एकाच वेळी न करता, उत्तम दर्जाच्या मुरूमाचा २० ते ३० से.मी. जाडीचा थर, एकावर एक आंथरणे गरजेचे आहे. सदर प्रत्येक थरावर योग्य रीतीने पाणी मारुन निर्धारीत कमाल प्रॉक्टर घनता मिळेपर्यंत थरांची कंपनशील दबाईयंत्राने ( Vibro Roller ) दबाई करावी. रस्त्याच्या पृष्ठभागाला योग्य कमानी सारखा आकार (Chamber) येण्या साठी भराव करतानांच काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरुन रस्त्याचे वरील कवच योग्य आणि तांञिकदृष्ट्या तयार करता येईल. रस्ता तयार करताना पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे देखील गरजेचे आहे, रस्याच्या पृष्ठभागावरील पाणी योग्य रितीने वाहुन जावे त्या करीता रस्त्याचा पृष्ठभाग हा कमानी च्या आकाराचा असणे आवश्यक आहे. तसेच रस्त्याच्या वळणावर, केंद्रस्थानीय शक्तीबलाचा (Centrifugal Force )परीणाम घटविण्यासाठी रस्त्याची बाह्य कड आतील कडेपेक्षा योग्य प्रमाणात उंचावलेली ( Superelevation ) असली पाहिजे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी, रस्त्याच्या दिशेने (Longitudinal direction  ) आणि रस्त्याच्या लंब दिशेला ( Transverse direction ) आवश्यक उतार देणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी योग्य आकाराचे नाले (Storm water drains ) बनविणेही आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रस्ता बनविणारे कंञाटदार व कार्यकारी व पर्यवेक्षण अधिकारी व कर्मचारी यांची भ्रष्टाचार विरहित मानसिकता.

विशाल लंगडे - 
अगदी बरोबर आहे..80 टन किवा त्या पेक्षा जास्त वजन पेलवणारे रस्ते बनविणाऱ्या कंपन्या भारतात आहेत , पण भ्रष्टाचारामुळे अश्या कंपन्यांना काम मिळत नाही / त्या काम घेत नाहीत

विशाल गोहील - आपले म्हणणे बरोबर आहे. पण काही ठिकाणी जसे कोपरगाव तालुका बागायती आहे. इथे मुरूम मिळणे अवघड आहे. अश्या वेळेस काय करावे?

आनंद बावणे - मूळ प्रश्न रस्त्यासंबंधी आहे . रस्ता म्हणजे बहुतेकांना डांबरी रस्ता अभिप्रेत असावा . डांबरी रस्ता करण्यामध्ये सध्या खूप सुधारणा झालेल्या आहेत . पूर्वी सेमी ग्राऊट , फुल ग्राउट रस्ते होत  . कारण आर्थिक चणचण आणि आधुनिक यंत्रांची वाणवा . त्यावेळी जे डांबर वापरले जाई त्यास asfalt ( ३०/४० , ६०/७० , ८०/९० ) अशी नावे होती व थरानुसार क्वालिटीत बदल असे . आता जुने पेव्हर , आधुनिक पेव्हर आलेले आहेत व त्यात bitumin वापरतात . बिटुमिन asfalt पेक्षा सॉफ्ट असते . डांबरी रस्त्याची गुणवत्ता bitumin च्या क्वालिटी वर अवलंबून आहे .
लोकप्रतिनिधी मधील भ्रष्ट्राचार आणि प्रशासनातील भ्रष्ट्राचार आज पन्नास टक्के पर्यंत पोहोचला आहे . रस्त्याच्या ( डांबराच्या ) गुणवत्तेवर याचा खूप प्रभाव पडतो . ते एक तर कमी वापरले जाते किंवा रॉकेल मिक्स केले जाते ) यासाठी फक्त ठेकेदार दोषी नसतो . ही सर्व यंत्रणा सडलेली आहे .
रस्त्याचा बेस , वळण , पावसाची तीव्रता , वाहनांची संख्या ( ट्रॅफिक लोड ) व अवजड वाहनांची क्षमता , नागरी किंवा हिली एरिया या व अशा बाबी रस्त्याचे गणित व रचना ( डिझाइन ) ठरवतात . हे आपल्याकडे फक्त कागदावर पाहिले जाते .
रस्ता करण्यापूर्वी त्याचे आयुष्य आणि त्यासाठीची रस्ता खुदाईची पूर्वतयारी कुठेही , कोणीही व कधीही करीत नाही . रस्ता केल्यानंतर लगेच पाणी खरे , ड्रेनेज , वीज , टेलिफोन हे सर्व अगत्याने खुदाईसाठी सरसावतात . खरे म्हणजे कोणी ऑडिट घेऊ नये म्हणून तशी आधीपासून तजवीज केलेली असते . जे जनतेला दिसते ते यंत्रणेला दिसत नाही असे कधी तरी शक्य आहे का ? ही सर्व मिलीभगत आहे . असो .

अजय - मुरूम उपलब्ध होतो रावसाहेब परंतु वाहतुकदर वाढतो. पर्यायाने कामाची अंदाजपञकिय रक्कम वाढते. पण त्यावर ही काहि प्रमाणात दुसरे साधंन वापरुन किंवा पारंपारीक पध्दत सोडुन वेगळे पर्याय वापरु शकतो.

ओमकार गिरकर - आपल्याकडं थियरी आणि प्रत्यक्ष काम यात प्रचंड तफावत पडते. याचं मुख्य कारण म्हणजे साईटवर काम करणारा जो कामगार वर्ग आहे तो प्रामुख्यानं केवळ 'श्रममूल्य' मिळतं म्हणून शेती वा अन्य मेहनतकेंद्री क्षेत्रातून बांधकामाकडं वळलेला आहे. साईटवर देखरेख करणाऱ्या सुपरवायझर /इंजीनीअर इतकंच कामगारांच्या कौशल्याकडे गांभिर्यानं पहायला पाहीजे जे आता बिलकूलच होत नाहीय. 

कंत्राटदार वर्ग हा प्रामुख्याने याआधी सावकारी करणारा / व्यापारातून पैसे कमावलेला व अतिरीक्त धन लावू शकणारा वर्ग आहे. त्यांच्याकरीता कंस्ट्रक्शन म्हणजे फक्त एक व्यापार आहे. त्यांना तांत्रिक बाबींशी फार घेणंदेणं नसतं. 

अभियंता/ देखरेख करणारा वर्ग. कागदोपत्री शिक्षीत वर्ग. पण, प्रत्यक्ष कामाबाबत एखादा इंजीनीअर तयार व्हायला किमान १० वर्षे जातात. 

हे थोडक्यात आपल्या कंस्ट्रक्शन क्षेत्राबाबत.

सुचिकांत - खूप चांगली माहिती दिलीत साहेब. सर्वांना धन्यवाद.

No comments:

Post a Comment