आपल्या देशातील सर्व भागांत साधारणत: वर्षांतील पावसाळ्याच्या चार-साडेचार महिने पाऊस पडतो. जून ते ऑक्टोबर हा पावसाचा कालावधी असतो. उत्तर भारतात हिमालयाच्या डोंगररांगावर पाऊस हिमवर्षांवच्या स्वरूपातदेखील पडतो.
पाऊस हा पाण्याचा उगम असल्यामुळे पाण्याच्या मोजणीचा विचार करीत असताना पावसाची मोजणीविषयी समजून घेणेही आवश्यक आहे. पावसाच्या मोजणीचे एकक हे मेट्रिक सिस्टीममध्ये मिलिमीटर तर ब्रिटिश सिस्टीममध्ये इंच (एक इंच म्हणजे २५.४ मिलिमीटर) आहे. बर्फाच्या स्वरूपातील पावसाची मोजणीदेखील याच एककात केली जाते.
पावसाची मोजणी ही पर्जन्यमापकाच्या मदतीने केली जाते. पर्जन्यमापक हे साधारणत: रेकॉडिंग आणि नॉन-रेकॉडिंग अशा दोन प्रकारांत असतात.
रेकॉडिंग पर्जन्यमापक हे स्वयंचलित असून; त्यामध्ये घडय़ाळावर चालणारा ड्रम, त्यावर बसवलेले आलेखपत्र (ग्राफ) आणि त्यावर आलेखन करणारी पेन्सिल, इत्यादींचा समावेश असतो. पडलेला पाऊस आलेखपत्रावर आपोआप वाचता येतो. या पर्जन्यमापकावर ठरावीक कालावधीत पडलेला पाऊस, तसेच पावसाची तीव्रतासुद्धा (मिलिमीटर/तास) मोजता येते. या पर्जन्यमापकाद्वारे पंधरवडय़ाचा एकूण पाऊसही मोजता येतो; म्हणूनच डोंगरदऱ्यांच्या दुर्गम भागात याचा वापर सोयीचा होतो. या उपकरणाच्या वापरासाठी माणसाची गरज नसते.
नॉन-रेकॉडिंग पर्जन्यमापक हे फार सोपे आणि साधे उपकरण आहे. भारतामध्ये मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ या नावाने ओळखले जाते. हे पर्जन्यमापक जमीन पातळीवर पक्केबसवलेले असते. दररोज सकाळी आठ वाजता पर्जन्यमापकाच्या बाटलीत जमा झालेला पाऊस प्रमाणित मोजपात्राद्वारे मिलिमीटर वा इंचामध्ये मोजला जातो. या पर्जन्यमापकाद्वारे मागील २४ तासांतील पडलेल्या पावसाची उंची मोजता येते. पाऊस जमा करणारी बाटली साधारणत: १०० मिमी व्यासाची असते आणि ती १०० ते १२५ मिमी पाऊस जमा करते. मोठय़ा पावसाच्या कालावधीत दिवसातून तीन -चार वेळा मोजणी करावी लागते.
पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक ठेवताना, त्या ठिकाणापासून किमान ३० मीटरच्या त्रिज्येमध्ये झाड, इमारत इ. अडथळे नसावेत. सपाट प्रदेशामध्ये साधारणत: १०० चौरस किलोमीटर क्षेत्राच्या परिसरात किमान एक पर्जन्यमापक असण्याची गरज आहे. हिमवर्षांव मोजण्यासाठी नॉन रेकॉडिंग स्नो गेजचा वापर केला जातो.
– डॉ. दि. मा. मोरे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,
चुनाभट्टी, मुंबई २२

No comments:
Post a Comment