Saturday, July 21, 2018

टाईल फ्लोअरिंग आणि मार्बल फ्लोअरिंगमध्ये नेमका काय फरक आहे? दोन्हीचे फायदे आणि तोटे कोणते?

टाईल फ्लोअरिंग आणि मार्बल फ्लोअरिंगमध्ये नेमका काय फरक आहे? दोन्हीचे फायदे आणि तोटे कोणते? मला नवीन घर बांधायचं आहे, त्यासाठी माहिती हवी आहे.

- वैभव तुपे (इगतपुरी)

उत्तर :-

ओमकार गिरकर :

टाईल -

१. कृत्रिम , मानवनिर्मित,
२. मटेरीयल : सिरॅमिक, व्हीट्रीफाईड (चकाकी असलेली) ,
३. जाडी : ८ ते १४ मीमी पर्यंत
४. हवी ती रंगसंगती
५. ऍसिडीक फार परीणाम होत नाही.
६. दर : ५०० रूपये स्वे. मी  पासून पुढे (बसवण्याचा दर + साहीत्य याचा खर्च वेगळा)

मार्बल - 

१. नैसर्गिक , कमावलेली खोदून काढलेली.
२. नैसर्गिकरित्या जसं असेल तसा, थोडंफार पॉलीश करता येतं .
३. जाडी : कमीतकमी १८ मीमी हवी. त्यामुळे वजनाला जास्त होतात.
४. चार ते पाच रंग
५. ऍसिडीक प्रक्रीयेला बळी पडतात.
६. दर : ५५० ते १४०० रू. स्क्वे मी. (इतर खर्च वेगळा) स्थानिक बाजारपेठा फिरून दर काढणे इष्ट.

अजय :

टाईल फ्लोरींग -

टाईल म्हणजेच फरशी जी मानव निर्मित असते, जी निसर्गात उपलब्ध असलेल्या साहित्या पासुन निर्माण  करतात. ठराविक कालावधी नंतर त्याची झिज होते परिणामी देखभाल दुरुस्ती वारंवार करावी लागते. खर्च कमी आसतो.

मार्बल फ्लोरींग - 

मार्बल, कोटा, कडाप्पा, तांदुर, शहाबाद व ग्रेनाईट ई. प्रकारच्या दगडापासुन ह्या प्रकारची फ्लोरींग तयार करता येते. हा निसर्ग निर्मित पदार्थ आसल्याने याची झिज हि फार हळु हळु प्रमाणात होते. ह्या प्रकारच्या दगडांच्या खाणी आसतात. ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात त्यांचा वाहतुक दर वाढत आसल्याने ह्याची किमंत देखील वाढते. मार्बल फ्लोरींग दिसायला देखील सुंदर असते.

सिद्धू :-

सर हे आपल्याकडे असलेल्या आर्थिक भांडवलावर अवलंबून आहे

१. Tile flooring - Ceramic Tile आणि Vitrified Tile

Ceramic Tiles- हे टाईल्स फक्त चिकनमाती पासून बनवली जातात. हे टाईल्स पाणी शोषून घेतात, मजबूतपणा कमी असते, या फरशीवर डाग आणि सुरकुत्या लवकर पडतात.याची किंमत कमी आहे.

Vitrified टाइल चिकणमाती आणि सिलिका, तुरुंग आणि फेलस्पापसारख्या घटकांपासून तयार केली जाते.हे मिश्रण एक उच्च तापमानात बनवले जाते त्यामुळे काचेची आवरण त्यावर। तयार होते म्हणून
पाणी शोषण्याची क्षमता आणि डाग प्रतिरोधक आहेत.याची किंमत ceramic tiles पेक्षा जास्त आहे.या दोन्हीचा मजूरी दर एकच घेतला जातो.

२. Marbles(संगमरवरी दगड)  आणि ग्रॅनाईट हे दोन्ही दगडी नैसर्गिक आहेत या दगडांमुळे घराची शोभा वाढते आणि घर दिमाखदार उठून दिसते. मार्बल पेक्षा ग्रेनाईट महाग आहे .

मनोज खांडरे :

लादींचे विविध प्रकार व उपयुक्तता

मुख्यत्वेकरून जमिनी, भिंती, छत आणि इमारतीतील अन्य पृष्ठभागांचे सुशोभिकरण, संरक्षण, झीज प्रतिबंधन आणि जल प्रतिबंधन करण्यासाठी अनुक्रमे  फरशी, लादी आणि कौले यांचा वापर केला जातो. या सर्वांना इंग्रजीत सरसकट टाईल्स ( Tiles ) असे संबोधतात. लादीकामांसाठी प्रामुख्याने पुढील दोन प्रकारचे साहित्य वापरले जाते.

१. कृत्रिम लादी किंवा फरशी
२. नैसर्गिक दगडी लादी किंवा फरशी

कृत्रिम लादींचे प्रकार :

१. चकाकणारी गुळगुळीत लादी ( ग्लेज्ड टाईल्स ) स्वच्छतागृह / स्नानगृहातील भिंतींला लावण्यासाठी किंमतीत स्वस्त प्रकार
२. खरबरीत लादी ( सिरॅमिक टाईल्स ) जमिनींवर लावण्यासाठी थोडा परवडण्यासारखा  परंतु हल्ली काहीसा कमी लोकप्रिय प्रकार
३. घसरण प्रतिबंधक लादी ( अँटी स्कीड टाईल्स ) गच्ची किंवा स्वच्छतागृह / स्नानगृहातील जमिनीवर लावण्यासाठी अत्यावश्यक प्रकार
४. अत्याधुनिक काचेरी मुलामायुक्त लादी ( व्हीट्रीफाईड टाईल्स ) सार्वजनिक रहदारीच्या जमिनीवर, घरामधील मुख्य जागी, हल्लीचा सर्वात जास्त प्रचलीत, थोडा महाग पण टिकाऊ आणि सुंदर प्रकार
५. सिमेंट लादी ( मोझेक टाईल्स ) घरामधील मुख्य जागी हा प्रकार पूर्वी वापरत असत.
६. लाकडी लादी ( वुडन टाईल्स ) विशिष्ट कार्यासाठी उदा. बॅडमिंटन कोर्टाच्या जमिनीवर
७. काचेची लादी ( ग्लास टाईल्स ) विशिष्ट कार्यासाठी
८. कौले ( मँगलोर टाईल्स ) घराच्या छतावर लावण्यासाठी

नैसर्गिक लादींचे प्रकार :

१. रुपांतरीत दगड - संगमरवर ( मार्बल ) : ठिसूळ असून आम्ल, साबण किंवा हळदी इ. शी रासायनिक अभिक्रिया होऊन कायमचे डाग पडतात.

२. अग्नीजन्य दगड - कणाश्म ( ग्रॅनाईट ) थोडा खर्चिक पण टिकाऊ आणि सुंदर प्रकार

३. गाळाचे दगड - कोटा, शहाबाद, कडाप्पा आणि तांदुर फरशी इत्यादी. कमी महत्त्वाच्या दुय्यम स्थानी वापरु शकतो. किंमतीला इतरांच्या तुलनेत स्वस्त.

कृत्रिम लादींपेक्षा नैसर्गिक दगडांपासून केलेले लादीकाम हे खर्चिक, वेळखाऊ असून त्यासाठी अत्यंत प्रशिक्षित आणि अनुभवी कारागीर लागतात. परंतु विशिष्ट सुशोभिकरणाच्या आणि टिकाऊ कामांकरिता उदा. स्वयंपाकघरात ओट्यासाठी, उदवाहनाच्या प्रवेशद्वारावर, जिन्यांच्या पायरीवर किंवा प्रवेश कक्षाच्या सुशोभिकरणासाठी टिकाऊ आणि सुबक कणाश्म ( ग्रॅनाईट ) वापरणे केव्हाही उत्तम.

No comments:

Post a Comment