आपल्याच बांधलेल्या घराची किंमत मार्केट रेटप्रमाणे कशी ठरवायची असते? त्याची प्रोसेस काय ? - वामन गोखले
विशाल गोहिल:
आपल्या जवळच्या दुय्यम निबंधक कार्यालयातून रेडी रेकनर दर पत्रक घेऊन घर कोणत्या प्रकारात आहे किती क्षेत्रफळाचे आहे त्या प्रमाणे घराची किंमत मार्केट रेट प्रमाणे काढता येते.
किंव्हा दुय्यम निबंधक कार्यालयात जागेचा उतारा व घराचा पूर्णत्वाचा दाखल देऊन अर्ज केल्यास बाजार भावाने घराची किंमत मिळेल.
सुनील वरपे - Civil: रेडिरेकनर चे दर आणि प्रत्यक्ष दर यात फरक येतो ,चालू बाजारभाव तपासा.
विशाल गोहिल : जागेची खरेदी विक्री रेडी रेकनर दरानुसार होते.
________________
अक्षय थोरात - Civil: रेडी रेकनर दरात मुख्यत्वे कोणत्या बाबींचा सामावेश असतो ??
R@vi Edake - Civil: रेडी रेकनर म्हणजे काय
प्रदीप शेटे :
पूर्वी खरेदी विक्री करताना घरांच्या खऱ्या किंमतीपेक्षा खूप कमी किंमतीचे agreement दुय्यम निबंधकाकडे व्हायचे. दोन्ही पार्टी agreement साठी (कमी किंमत दाखविल्यामुळे) सरकारकडे कमी कर भरावा लागायचा म्हणून या व्यवहाराला सहमत असायचे. यामुळे काळा पैसा निर्माण व्हायचा. यावर अंकूश बसावा म्हणून सरकारने ज्या ठिकाणचा खरेदी व्यवहार होणार त्या ठिकाणचे खरे बाजारभाव काय आहे त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणची सूची(रेडीरेकनर) तयार करून ती प्रसिद्ध करायला सुरवात केली. यापेक्षा कमी भावाने खरेदीखत होऊ नये हा त्या मागचा उद्देश आहे. या रेडीरेकनरमुळे बऱ्याच प्रमाणात काळा पैसा निर्माण होण्यावर प्रतिबंध आला आहे.
मयुरेश मनोहर आंग्रे - Civil:
पण आता परिस्थिती अशी आहे का रेडी रेकनर जास्त आहे आणी बाजारभाव कमी आहे आणि अशा परीस्थितीमुळे रीअल ईस्टेट मंदीमध्ये आहे
विशाल गोहिल: अजूनही काही ठिकाणी घराच्या किमती खूप जास्त आहे. मंदी फक्त हातात cash नसल्याने आहे.
मनोज खांडरे - Civil:
स्थावर मालमत्ता ( Immovable Property ) म्हणजे निवासी सदनिका, व्यापारी गाळे अथवा दुकाने, जमीनी, औद्योगिक गाळे आदींच्या खरेदी-विकी साठी महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे दर वर्षी वार्षिक बाजार मूल्यांकन तक्ता ( ASR : Annual Statement of Rates) म्हणजेच ( Ready Reckoner ) जाहीर केला जातो.
वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करणेची पध्दत सन १९८९ साली सुरु झाली.
नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक व मूल्यांकन कार्यालय पुणे, महाराष्ट्र शासन दर वर्षी स्थावर मालमत्ता मूल्य दर जाहीर करते. वार्षिक मूल्य दर तक्ता सामन्य इंग्रजी भाषेत (रेडी रेकनर) म्हणतात. सदर वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते आता पर्यन्त प्रत्येक वर्षीच्या १ जानेवारी पासून ते ३१ डिसेंबर त्या त्या वर्षा पर्यंत जाहीर करण्यात येत होते.
महाराष्ट्र मुद्रांक ( मिळकतीचे वास्तव बाजार मूल्य निश्चित करणे ) नियम १९९५ अंतर्गत तयार केलेले जाते, जमीन व इमारतीचे दर दर्शविणारे तक्ते म्हणजे वार्षिक मूल्य दर तक्ते. जमीन व इमारतीचे खरेदी - विक्री, करारनामा, खरेदीखत, विक्री करार, अदलाबदलपत्र, विक्री प्रमाणपत्र, वाटपपत्र, कुलमुखत्यारपत्र ( मोबदला घेऊन अथवा मोबदला न घेता तिऱ्हाईत इसमास मिळकतीची विक्री करण्यासाठी दिलेले कुलमुखत्यारपत्र ), संव्यवस्था, भाडेपट्टा, भाडेपटयाचे हस्तांतरण व विकसन करारपत्र या दस्त ऐवजाचे विषयवस्तू असलेल्या ( म्हणजेच दस्तात नमूद ) मिळकतीचे खरे बाजार मूल्यानुसार मुद्रांक शुल्क विचारात घेतले जाते. दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क भरविणे कामी वास्तव बाजारमूल्य निश्चिती करण्यासाठी त्याचा उपयोग करणे अवाक्ष आहे.
R@vi Edake - Civil: रेडी रेनकर आणि DSR वेगवेगळे ना....??
मनोज खांडरे - Civil: होय. DSR म्हणजे District Schedule of Rates सरकारी बांधकामांच्या मूल्यांकनासाठी जाहीर होतात.
आनंद बावणे - Civil: प्रॉपर्टीची खरेदी-विक्री रेडी रेकनरपेक्षा कमी किमतीने होतेय . मात्र खरेदी दाराला रेडिरेकनर प्रमाणे (अधिक) मुद्रांक शुल्क द्यावे लागतेय. यात अजून एक धोका आहे . जो कमी किमतीला विकतो , त्यांच्याकडूनही (रेडी रेकनर -- विक्री किंमत ) या रकमेवर दहा टक्के दंड द्यावा लागतोय . हे रत्नागिरी येथे समजले !

No comments:
Post a Comment